गाव तिथे युवासेना
आबा न्यूज / जामनेर
युवासेनाप्रमुख मा.आदित्य जी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघात युवासेना आढावा बैठका घेण्यात याव्या अशा सूचना देण्यात आल्या.आज रोजी युवासेना जळगाव जिल्हा विस्तारक मा.चैतन्य जी बनसोडे व जिल्हाप्रमुख चंद्रकांत शर्मा हे उपस्थित होते.जामनेर तालुका विधानसभा मतदारसंघात तालुक्यातील कार्याचा आढावा यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
युवासेना उपजिल्हाप्रमुख राहुल चव्हाण यांनी जामनेर तालुक्यात युवासेनेने केलेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांची, आंदोलन,उपोषण संघटनात्मक कार्य या विषयी सविस्तरपणे मांडणी केली.
आगामी काळातील होणाऱ्या नगरपालिका,जिल्हापरिषद, पंचायत समिती,विधानसभा, लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून संघटनात्मक कामाला लागा. प्रत्येक निवडणूकीत *गाव तिथे युवासेना* हा संघटनात्मक मंत्र डोळ्यासमोर ठेवून नवीन पक्ष प्रवेश,शाखा डोळ्यासमोर ठेवून कामाला लागा अश्या सूचना देण्यात आल्या.
बैठक प्रसंगी शेख सईद यांनी मनोगत व्यक्त केले.नरेंद्र धुमाळ, शांताराम काळे,अंकुश जोशी, पवन भोई,शेख इम्रान,मयुर चौधरी,निलेश देवरे,रवी जोशी,मधुकर महाजन,योगेश गोसावी,राजेश पाटील,युवासैनिक उपस्थित होते.
