आबा न्यूज / जामनेर
जबरी चोरीतील गुन्ह्यातील आरोपितास सापळा रचून अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीस चाळीसगाव येथे अटक करून शहर पोलीस स्टेशन च्या ताब्यात देण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की,जबरी चोरीतील गुन्ह्यातील आरोपी शेख शाकीब शेख दाऊद वय 21 रा. जाम मोहल्ला भुसावळ असून यास पोलीस अधीक्षक एम राजकुमार आणि अपर पोलीस अधीक्षक जळगांव चंद्रकांत गवळी तसेच रमेश चोपडे अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव व सहायक पोलिस अधीक्षक चाळीसगाव अभयसिंग देशमुख यांच्या आदेशाने किसन नजन पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगांव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण पाटील , रणजित जाधव , श्रीकृष्ण देशमुख , आणि महेश सोमवंशी यांना भुसावळ येथून मिळालेल्या बातमीची खात्री करून सदर आरोपीस सापळा रचून चाळीसगाव येथे अटक केली आहे.
सदर आरोपी शेख शाकिब शेख दाऊद याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता गुन्ह्याची कबुली दिली आहे.चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन 363/2023 भादवी कलम 394 , 34 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपासकामी आरोपीस चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन च्या ताब्यात देण्यात आले आहे.
