५ ऑगस्ट रोजी जयंती मिरवणूक चे समाज बांधवांच्या वतीने नियोजन
आपला बातमीदार न्युज | यावल प्रतिनिधी ✒️
यावल येथे साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ.आण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून मातंग समाज बांधवांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
सविस्तर वृत्त असे कि आज दि. १ ऑगस्ट,साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ.आण्णा भाऊ साठे यांची जयंतीच्या निमित्ताने सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे, एवढेच नाहीतर शासकीय, निमशासकीय कार्यालयात सुद्धा अभिवादन करण्यात येत आहेत, त्याच प्रमाणे यावल येथील समाज बांधवांच्या वतीने साहित्यरत्न डॉ. आण्णा भाऊ साठे व भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले,जयंती उत्सव समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर अवचार यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले तर उपाध्यक्ष विलास मोरे व कोषध्यक्ष अशोक भालेराव यांच्या हस्ते धूप दीप प्रज्वलन करण्यात आले, तर सदर कार्यक्रमाची जयंती मिरवणूक दि:- ०५/०८/२०२५ रोजी सर्व समाज बांधवांच्या वतीने यावल शहरातुन मोठ्या उत्सवात निघेल असे जयंती उत्सव समितीने सांगितले तर या वेळी नेटके सर, गजानन बिऱ्हाडे, सुभाष साबळे, सुनील बिऱ्हाडे, प्रेम मोरे, गोविंदा मोरे, रमेश जाधव सखाराम वैराळे, मधुकर रणपिसे, मनोज साबळे सह सामाज्यात अनेक महिला पुरुष उपस्थित होते.
