बोदवड़ एज्यूकेशन सोसायटी संचालित रोज पेटल्स इंग्लिश मेडियम स्कूल बोदवड़ येथे आज दि. ३१ जुलै २०२५ वार गुरुवार *पालक शिक्षक सभा* मोठ्या उत्साहात पार पडली. शाळेचे मुख्याध्यापक श्री. अरविंद वाघ सर यांनी सभेचे अध्यक्ष स्थान भूषविले.
सर्वप्रथम सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या शैक्षणिक वर्षासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे शिष्यवृत्ती परीक्षा, एम.टी.एस. परीक्षा, मंथन परीक्षा, सायन्स ऑलिंपियाड, ज्ञानवर्धिनी परीक्षा, राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक यांनी आपले विचार व्यक्त करतांना सांगितले की, आजच्या स्पर्धेच्या युगात, आपल्या मुलांनीही पुढे जावे आणि हे तेव्हाच साध्य होईल जेव्हा तुम्ही आणि आम्ही आपल्या मुलांना अभ्यासात येणाऱ्या अडचणी सोडवू आणि काही नवीन बदल घडवू.
आपण एकत्र येऊन एक चांगला समाज निर्माण करू, हा आपल्या पालक-शिक्षक सभेचा मुख्य उद्देश आहे* आजपर्यंत तुम्ही आम्हाला पाठिंबा देत आला आहात आणि भविष्यातही तुम्ही आम्हाला पाठिंबा देत राहाल अशी आम्हाला आशा आहे.*तुम्ही सर्वजण आमच्या शाळेचा एक भाग आहात.*
या कार्यक्रमाचे संचालन सौ. वैशाली पालवे मॅडम यांनी तर शाळेत गठीत विविध समित्यांचे अहवाल वाचन सौ. राधिका जोशी मॅडम यांनी केले आणि आभार प्रदर्शन कु. पूजा जाधव मॅडम यांनी केले. शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे या सभेसाठी सहकार्य मिळाले.
