जामनेर विधानसभा निवडणुकीत सलग सातव्यांदा महायुती तर्फे भाजपा पक्षाकडून ना.गिरीश महाजन यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल
महाराष्ट्रातील होऊ घातलेल्या २०२४ विधानसभा निवडणुकीत आज शेवटच्या दिवशी दि.२९ रोजी सर्व दिग्गज नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
जामनेर तालुक्याचे विकास महर्षी तसेच भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे ना.गिरीश भाऊ महाजन यांनी शक्ती प्रदर्शन करत महायुती च्यावतीने भाजपा पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.
जामनेर शहरातील पाचोरा रोड वरील बाबाजी राघो मंगल कार्यालय येथून देव मामलेदार बँड पथकाच्या गाजावाज्यासह हजारोंच्या संख्येने सहभागी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून ना.महाजनांनी जनतेस संबोधित केले.
यावेळी जळगाव लोकसभा खासदार स्मिताताई वाघ आणि रावेर लोकसभा खासदार रक्षाताई खडसे, माजी खासदार उल्हास पाटील,मा.जि.प.अध्यक्षा प्रयागताई कोळी,पाचोरा मा.आमदार किशोर आप्पा पाटील,भुसावळ मा.आमदार संजयजी सावकारे,जळगाव मा.आमदार राजुमामा भोळे भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर , नाना बाविस्कर , संजयदादा गरूड, डॉ.सागर गरूड, गोविंद अग्रवाल,तुकाराम निकम अनिस शेख,नाजिम पार्टी,तसेच महायुतीचे सर्व नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
